कुणी तरी येणार येणार गं..! वहिनी साहेब उर्फ धनश्री काडगावकरने बेबी बंपसोबतचे फोटो केले शेअर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:09 PM2021-01-14T17:09:11+5:302021-01-14T17:19:54+5:30

धनश्री काडगावकरने बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तीरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे.

धनश्री काडगावकरने बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पतीच्या वाढदिवसाच्याच दिवशी धनश्रीने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

ही गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला होता.

धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी धनश्रीने डोहाळे जेवणाचे काही फोटो शेअर केले होते.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.

धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.