कुणी म्हणतंय अप्सरा, तर कुणी देवसेना, 'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचे नवीन फोटोशूट झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:06 PM2021-09-18T12:06:44+5:302021-09-18T12:19:03+5:30

'तुझ्यात जीव रंगला'च्या पाठकबाईंचे नवीन फोटोशूट पाहून चाहत्यांना झाली अप्सरा आणि देवसेनाची आठवण.

तुझ्यात जीव रंगला राणादा आणि अंजली बाई यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि केमिस्ट्रीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती.

पाठक बाईंची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर हिने साकारली होती.

या मालिकेतून अक्षया देवधर घराघरात पोहचली. नुकतेच तिने फोटोशूट केले आहे.

अक्षया देवधरच्या नवीन फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

अक्षया देवधरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

अक्षया देवधरचे हे फोटोशूट पाहून अप्सरा आणि मराठीतील देवसेना अशी कमेंट करत आहेत.

एका यूजरने तिच्या फोटोवर कमेंट केली की, 'जेव्हा मराठीमध्ये बाहुबली सारखे चित्रपट बनवतील तेव्हा तूच त्या चित्रपटातील देवसेना असशील'.

अक्षया देवधरचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अक्षया देवधर बऱ्याचदा फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे.