"ही तर पत्तागोबी"अजब फोटोशूटमुळे अभिनेत्री झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 02:28 PM2021-04-12T14:28:09+5:302021-04-12T14:35:51+5:30

Rubina Dilaik, winner of BigBoss Season14 तिचे फोटो पाहून चाहते विचित्र कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला.

रुबीना अभिनयासोबतच मॉडलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. तिनं मिस शिमला 2006 आणि मिस नॉर्थ इंडिया 2008 हे किताबही आपल्या नावी केले आहेत.

अभिनेत्रीनं 2018 मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्न बंधनात अड़कली आहे. अभिनवही अभिनेता असून बिग बॉसमध्ये काही दिवस रुबीनासोबत होता.

रुबीना दिलैक छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. रुबीनानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

रुबीनाने 'छोटी बहू' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केलं होतं.

रुबीना 'शक्तिः अस्तित्व के अहसास की', 'बनू मैं तेरी दुल्हन', 'पवित्र रिश्ता', 'कसम से', 'पुनर्विवाह-एक नई उम्मीद', 'देवों के देव महादेव' यासारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.

रुबिना हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते.त्यामुळे पुन्हा एकदा फॅशनमुळेच चर्चेत आली आहे.

सध्या तिच्या अजब गजब फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.

तिचे फोटो पाहून चाहते विचित्र कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read in English