PICS: नवं फोटोशूट शेअर करत रुबीनाने जिंकलं चाहत्यांचं मन, ट्रोलर्सची केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:01 PM2021-04-20T16:01:14+5:302021-04-20T16:02:55+5:30

गेल्या काही दिवसांपासून रुबीना दिलैक तिच्या फोटोशूटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. (Photo Instagram)

रुबीनाने आपलं नवं फोटोशूट शेअर करत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास दिसतोय. (Photo Instagram)

'बिग बॉस 14'ची विजेती रुबीना ने केलेल्या फोटोशूटची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात होती. तिचं नवं फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. (Photo Instagram )

रुबीनाने छोटी बहू या मालिकेद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुुरुवात केली. (Photo Instagram)

देवों के देव महादेव, पुर्नविवाह, जीनी और जूजू या तिच्या मालिका चांगल्याच गाजल्या आहेत. (Photo Instagram)

रुबीना अभिनयासोबतच मॉडलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. तिनं मिस शिमला 2006 आणि मिस नॉर्थ इंडिया 2008 हे किताबही आपल्या नावी केले आहेत. (Photo Instagram)