‘माझ्या नव-याची बायको’मधील ‘रेवती’ तुम्हाला आठवते का ? तिचा हा अंदाज बघून तुम्हीही पडला तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:28 PM2021-06-24T14:28:24+5:302021-06-24T14:45:18+5:30

माझ्या नव-याची बायको ही मालिका छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना चांगलीच भावली होती. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या रेवती या श्वेताच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती.

या मालिकेत रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबद्दल प्रचंड राग दाखवण्यात आला होता.

रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली होती.

श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे.

'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते.

या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

यानंतर श्वेता आणि राहुल लग्नबंधनात अडकले.

रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे.

नायक, या गोजिरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!