रात्रीस खेळ चाले 3 मधील अभिरामची पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:00 AM2021-04-05T07:00:00+5:302021-04-05T07:00:02+5:30

रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेच्या याआधीच्या सिझनप्रमाणेच या मालिकेला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिरामने दुसरे लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव कावेरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

कावेरी ही केरळमधील असून तिला मराठी बोलता येत नाही. त्यामुळे कावेरीचे अधिकाधिक संवाद हे केरळी भाषेतील आहेत.

या मालिकेतील ही कावेरी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.

या मालिकेत कावेरीची भूमिका भाग्या नायर साकारत असून ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

भाग्या नायरच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला आपल्याला तिचे विविध फोटो पाहायला मिळतात.

भाग्याने या मालिकेआधी एका वेबसिरिजमध्ये काम केले होते.

भाग्याने क्षणिक या शॉर्टफिल्ममध्ये देखील काम केले आहे.

भाग्याने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.

भाग्याला खूपच कमी वेळात रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली आहे.