रसिका सुनिलने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो,एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:24 PM2021-06-16T12:24:42+5:302021-06-16T12:34:36+5:30

'माझ्या नव-याची बायको' या लोकप्रिय मालिकेतून लाइम लाइटमध्ये आलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. रसिकाने साकारलेली शनाया ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती.

रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.

विशेष म्हणजे निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिकाने शनाया साकारली होती.

तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांच्या शनाया पसंतीस पात्र ठरली होती.

रसिका सुनिल आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

दोघांनीही नविन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं.

दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसले.

आता पुन्हा एकदा रसिकाने बॉयफ्रेंड आदित्यसोबतच एक छानसा फोटो शेअर केला आहे.फोटोला समर्क अशी कॅप्शनही दिली आहे.

दोघांचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांचे पुन्हा हार्ट ब्रेक झाले असणार. ​तर दुसरीकडे लाईक्स आणि कमेंट्स करत चाहते फोटोला पसंती देत आहेत.

सा-या जगापासून दूर आणि कोणालाही जराही कुणकुण लागू न देता गुपचुप गुपचुप दोन दिल एकत्र आले होते.

आता प्यार किया तो डरना क्या म्हणत ते करतायत खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!