'बिग बॉस 14' मधील हाएस्ट पेड कंटेस्टेंट आहे राधे माँ, एका आठवड्यासाठी घेणार इतके लाख

By गीतांजली | Published: October 1, 2020 04:09 PM2020-10-01T16:09:06+5:302020-10-01T17:00:45+5:30

बिग बॉस 14 मध्ये राधे माँचा महिमा बघायला मिळणार आहे. खऱ्या आयुष्यात राधे माँ नक्की कशी आहे हे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार राधे माँ हाएस्ट पेड कंटेस्टेंट आहे. राधे माँ ला प्रत्येक आठवड्यासाठी 25 लाख दिले जाणार आहेत.

यात बातमीत किती सत्य आहे ते राधे माँ आणि मेकर्सनाच माहिती असले. राधे माँ च्या मानधनाला घेऊन अजून काही ऑफिशली स्टटमेंट आलं नाही.

गेल्या वर्षीही राधे माँ ला मेकर्स नी अप्रोच केले होते अखेर यावर्षी स्पर्धक म्हणून ती या शोमध्ये सहभागी झाली.

सुखविंदर कौर उर्फ राधे माँ चा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. लहान वयात तिने आधात्मचा मार्ग धरला.

स्वत: ला देव समजणारी राधे माँ, गुरु मां चॅरिटेबल ट्रस्ट चालवते.

कलर्स चॅनलने आपल्या ट्विटर हँडलरवरुन एक प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये राधे माँ बिग बॉसच्या घरात जाताना दिसते आहे. मात्र राधे माँ चा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.

Read in English