PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 07:00 AM2020-05-18T07:00:00+5:302020-05-18T07:00:00+5:30

Apurva Nemlekar

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे सगळेच कलाकार सध्या आपल्या आपल्या घरी आहेत. 

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

लॉकडाउनच्या काळात अपूर्वाने विना मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

शेवंताच्या लूकमध्ये अपूर्वा जितकी सुंदर दिसते तितकीच ती विना मेकअप लूकमध्येही सुंदर दिसते.

तिचे फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडलात ना प्रेमात

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे.

तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.

तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे.

तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते.

पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते.

पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली.