PHOTOS: 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच पार पडणार अरुंधती आणि आशुतोषचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:26 PM2022-05-28T19:26:48+5:302022-05-28T19:33:05+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.सध्या या मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे.अरुंधतीनेदेखील अनिरुद्धप्रमाणे आशुतोषशी लग्न करून छान संसार केला पाहिजे, असे अनेकांना वाटते आणि हे लवकरच मालिकेत घडताना दिसणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेत लवकरच अरुंधती आणि आशुतोषचं धुमधडाक्यात लग्न पार पडताना दिसणार आहे. खरेतर ही मालिका हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका अनुपमावर आधारीत आहे.

अनुपमा ही मालिकेचा ट्रॅक आई कुठे काय करतेच्या ट्रॅकच्या पुढे आहे. त्यामुळे सध्या अनुपमा मालिकेत अनुज आणि अनुपमा यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. हा ट्रॅक आपल्यालाही आई कुठे काय करतेमध्ये लवकरच पाहायला मिळेल.

मालिकेत काही दिवसांपूर्वी आप्पा आशुतोषला अरुंधतीशी लग्न करशील का असे विचारतात. तसेच आप्पा अरुंधतीलाही याबाबत विचार करायला सांगतात. अरुंधतीची देखील आशुतोष सोबत खूप चांगली मैत्री होताना दिसते आहे.

दरम्यान आशुतोषचा अपघात होतो. त्यावेळी अरुंधतीलाही आशुतोषचं तिच्या मनात असलेले स्थान समजते आणि ती त्याची आणखी काळजी घेताना दिसते आहे.

कांचन आईनेदेखील आता आशुतोषला स्वीकारलं आहे. त्यामुळे आता त्या दोघांचे लग्न कसे होणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.