PHOTOS : अंकिता ते जुही...! हुबेहुब आईसारख्या दिसतात टीव्हीच्या या लोकप्रिय नट्या

Published: May 9, 2021 07:27 PM2021-05-09T19:27:55+5:302021-05-09T19:36:38+5:30

Mother's Day : आज मदर्स डेच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आईला शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीच्या बालाही यात मागे नाहीत. त्यांचे आईसोबतचे फोटो बघून तुम्हीही या फोटोंच्या प्रेमात पडाल...

टीव्हीची कॉमेडी क्वीन भारती सिंग अगदी आईसारखी दिसते. भारतीने आज मदर्स डे निमित्त आईच्या फोटोंचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिनेही आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात नेहा अगदी आईसारखी दिसतेय़ तुझ्याशिवाय मी असूच शकत नाही़... असे हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे.

अंकिता लोखंडे हिने आईला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तूच आयुष्य आहेस... तू फक्त तू आहेस,असे तिने लिहिले आहे.

दीपिका कक्कर हिनेही आईसोबतचा फोटो शेअर केला आहे, दीपिका अगदी आईच्या चेह-यावर गेलीये.

जन्नत जुबैर हिने आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मुश्किल राहों में भी आसान सफर लगता है... ये मेरी माँ के दुवाओं का असर लगता है..., असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

जुही परमार हिनेही आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तू फक्त किचनवर राज्य करत नाहीस तर आमच्या हृदयावरही करतेय, असे आईसाठी तिने लिहिले आहे.

मौनी रॉय हिनेही आईसोबतचा सुंदर फोटो शेअर करत तिला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत,

मदलसा शर्माने आईसोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे. यात ती हुबेहुब आईसारखी दिसतेय.

रोशनी चोप्राने बहिण आणि आईसोबतचा फोटो शेअर करत, आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!