अभिनेत्री म्हणते माझाही आता ॲागस्टमध्ये नव्याने जन्म होतोय, ९ व्या महिन्यात अभिनेत्रीचे खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:27 PM2021-07-26T19:27:32+5:302021-07-26T19:33:03+5:30

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ऑगस्टमध्ये उर्मिला तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या आगमनासाठी उर्मिला प्रचंड उत्सुक आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर बाळाच्या आगमनाची आतुरतेने ती वाट पाहत आहे.

प्रेग्नंसीच्या अखेरच्या टप्प्यात असून काऊंट डाऊनही सुरु झाले आहे.

दरम्यान,उर्मिलाने बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने साडी परिधान केली असून तिचे सौंदर्य अजून खुलून आले आहे.

उर्मिलाच्या चेहऱ्यावरही कमालीचा प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळतोय.

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रसिद्ध युटुबर सुद्धा आहे.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

सोशल मीडियावर उर्मिला निंबाळकर कायम सक्रिय असते.

उर्मिलाने काही मराठी तसेच हिंदी मालिकांमधेही काम केले आहे.

'दुहेरी' मालिकेत तिने काम केलं होते. ही मालिका विशेष गाजली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!