The Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त

Published: May 15, 2021 10:55 AM2021-05-15T10:55:35+5:302021-05-15T11:01:00+5:30

'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्तीने कोरोना लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी इंडस्ट्रीत करावा लागलेला स्ट्रगलविषयी सांगितले होते. एका शो व्यतिरिक्त पुरेसे काम नाही. तिला ज्या प्रकारचे काम हवे आहे ते तिला मिळत नसल्याची नाराजी तिने व्यक्त केली होती.

'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच तिच्या एका पोस्टमुळे सुमोना चर्चेत आली आहे.

पोस्ट शेअर करत तिने जॉबलेस असल्याचे सांत गेल्या काही वर्षापासून ती एका आजाराचा सामना करत असत्याचे म्हटले आहे.

२०११ पासून सुमोना एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रस्त आहे.

तिच्या या आजाराविषयीने तिने कधीच मोकळेपणाणे बोलली नव्हती.

तणावमुक्त राहणे, चांगला आहार घेणे आणि योग्य व्यायाम करणे हे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे.

पण लॉकडाऊनमध्ये भावनिक दृष्ट्या मी खचले आहे.

सध्या जॉबलेस असली तरी कुटुंबाला पुरेपुर आधार देण्यासाठी मी आजही सक्षम आहे.

आता मी अधिक चांगला दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!