या अभिनेत्यासोबत झाले होते जेनिफर विंगेटचे लग्न, काहीच वर्षांत झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 06:53 PM2020-05-30T18:53:42+5:302020-05-30T18:53:42+5:30

जेनिफर विंगेटने गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.

आज जेनिफरचा वाढदिवस असून तिने खूपच कमी वयात तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली.

जेनिफरने कसौटी जिंदगी की, दिल मिल गये, बेहद, बेपनाह यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

कुछ ना कहो या ऐश्वर्या रॉयच्या चित्रपटात जेनिफरने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

जेनिफरचे लग्न प्रसिद्ध अभिनेता करणसिंग ग्रोव्हरसोबत झाले होते. करण आणि तिने कसौटी जिंदगी की, दिल मिल गये यांसारख्या मालिकांमध्ये एकत्र काम केले होते.

जेनिफरचे करणसोबत पहिले लग्न असले तरी करणचे त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगम सोबत लग्न झाले होते.

श्रद्धाला घटस्फोट देऊन करणने जेनिफरशी लग्न केले होते. पण हे लग्न देखील काहीच काळ टिकले.

करणसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर डिप्रेशनमध्ये गेली होती.

करणने जेनिफरला घटस्फोट देऊन अभिनेत्री बिपाशा बासूसोबत तिसरे लग्न केले.