'हप्‍पू की उलटन पलटन' मालिकेत नव्या अभिनेत्रीची होणार एंट्री, त्याआधी पाहा तिच्या या ग्लॅमरस अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:21 PM2021-05-04T14:21:18+5:302021-05-04T14:30:26+5:30

टीव्‍ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्‍यानंतर मी मालिकेमध्‍ये योग्‍य भूमिका मिळण्‍याबाबत खूपच आनंदी आहे, ज्‍यासाठी मी अनेक ऑडिशन्‍स दिल्या. अखेर मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्‍यात आले.

मालिकेमध्‍ये लवकरच नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. मलायकाची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री जसनीत कौर कांत.

मुंबईमध्‍येच लहानाची मोठी झालेली जसनीतने यापूर्वीही काह मालिकांमध्ये भूमिका साकारल्‍या आहेत.

मलायका ही दबंग वृत्ती असलेल्‍या टॉमबॉयसारखी आहे, तर जसनीतचे व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत मितभाषी आहे.

या दोघींमधील साम्‍य म्‍हणजे जसनीत आणि तिची रील भूमिका मलायका या दोघींचाही त्‍यांचे जिवलग मित्रमैत्रिणी व कुटुंबांप्रती संरक्षणात्मक स्वभाव आहे, म्‍हणूनच मलायकाच्‍या भूमिकेसाठी जसनीत योग्‍य आहे.

पलटन मालिकेचा भाग होणे नक्कीच एक्सायटमेंट आहे. खासकरुन ''मला मलायकाची भूमिका आवडली आहे.

ती वेगळी असली तरी माझ्यासारखीच आहे. मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही घडलेली सर्वोत्तम गोष्‍ट आहे.

टीव्‍ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्‍यानंतर मी मालिकेमध्‍ये योग्‍य भूमिका मिळण्‍याबाबत खूपच आनंदी आहे.

ज्‍यासाठी मी अनेक ऑडिशन्‍स दिल्या. अखेर मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्‍यात आले.

मी मालिका पाहत आली आहे आणि नेहमीच मालिका व त्‍यामधील पात्रांनी सराईतपणे सादर केलेल्‍या विनोदांचे कौतुक करत आली आहे.

असे प्रतिभावान कलाकार अवतीभोवती असल्‍यामुळे मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजते. मला दररोज नवनवीन गोष्‍टी शिकण्‍यास मिळत आहेत.

मी भूमिका साकारण्‍यास सज्‍ज असताना यावेळी प्रेक्षकांना दबंग मलायकाचा नवीन अवतार पाहायला मिळेल.

आता प्रेक्षक 'नवीन मलायका काय नवीन घेऊन येत आहे?' हे जाणून घेण्‍यास उत्‍सुक असतील.''