'इश्कबाज' फेम नकुल मेहता लवकरच बनणार बाबा, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 07:00 AM2021-01-03T07:00:00+5:302021-01-03T07:00:02+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नकुल मेहताने पत्नी जानकी पारेखचे फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नकुल मेहता आणि जानकी पारेख यांनी प्रेग्नन्सी शूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नकुलने प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, इंडियाज गॉट टायलेंट, दिल बोले ऑबेरॉय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नकुल मेहताची पोस्ट पाहून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नकुल मेहताने मालिकांसोबतच वेबसिरिजमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेमुळे नकुलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)

'इश्कबाज़' या मालिकेत त्याने साकारलेल्या शिवाय आणि शिवांश या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)