१८ वर्षांनी लहान आहे राहुल महाजनची तिसरी पत्नी नतालिया, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

Published: May 13, 2021 03:21 PM2021-05-13T15:21:03+5:302021-05-13T15:33:29+5:30

चंदेरी दुनियेतील अनेक सेलिब्रेटीची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये राहुल महाजनचे नाव आघाडीवर आहे. एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत.

राहुलने 218 साली, कजाकिस्तानची मॉडेल नतालिया इलिनासोबत तिसरे लग्न केले होते.

राहुलने पहिले लग्न त्याची बालपणीची मैत्रीण श्वेता सिंहसोबत केले होते.

2006 मध्ये हे लग्न झाले होते. पण ते फार काळ टिकले नाही.

2010 साली त्याने डिंम्पी गांगुलीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण तीन वर्षातच ते वेगळे झाले.  

श्वेता आणि डिंम्पी दोघांनीही राहुलवर मारहाण व मानसिक छळाचा आरोप केला होता.

2018 मध्ये राहुलने नतालियासोबत लग्न केले. नतालिया ही मूळची कजाकिस्तानची आहे.

या लग्नात दोघांच्या कुटुंबाचे सदस्यच उपस्थित होते.

पारंपरिक पद्धतीने राहुल महाजनचे तीसरे लग्न पार पडले होते.

विशेष म्हणजे नतालियानेही लग्नात पारंपरिक पद्धतीने लाल रंगाची साडी नेसली होती.

राहुल महाजनसोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्विकारला.

या दोघांमध्ये वयाचेही अंतर खूप जास्त आहे.

लग्नावेळी नतालिया २५ वर्षांची होती तर राहुल महाजन ४३ वर्षाचा होता.

नतालिया खूप सुंदर दिसते. सौंदर्यांच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!