अखेर गुगलची भविष्यवानी खरी ठरली आणि बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैक ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:56 AM2021-02-22T00:56:15+5:302021-02-22T01:03:49+5:30

अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस-1४ शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत रुबीनाने गायक राहुल वैद्यवर मात केली. सगळ्यांत जास्त रसिकांनी रूबीनाला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच विजेती व्हावी अशी चाहत्यांची ईच्छा होती.

अखेर चाहत्यांची ईच्छआ विनर बनल रुबीनाने पूर्ण केली आहे. रुबीनाला ट्रॉफी आणि ३६ लाख रुपये मिळाले आहेत.

गुगलने फिनालेपूर्वीच रुबीनाचे विजेती म्हणून नाव घोषित केले होते.

तेव्हापासून गुगलने केलेले भाकित खरे ठरणार का याकडेच सा-यांच्या नजरा होत्या.

अखेर तो क्षण आला आणि रुबीनाने रसिकांची पहिली पसंती मिळवत विजते ठरली.

तर यावेळी सगळ्यात जास्त मनोंरनज करणारी ड्रामा क्वीन राखी सावंतने बिग बॉसने दिलेली ऑफस स्विकारत फायनलिस्टमधून बाहरे पडली.

राखी सावंत १४ लाख रु. रक्कम घेवून घराबाहेर पडली.

बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात सलमान खानने आपल्या शैलीत केली.

सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती.