Love In The Air! दिव्यांका त्रिपाठी नवरा विवेक दहियासोबत दिसली रोमँटिक अंदाजात, फोटोंना मिळतेय पसंती

Published: May 8, 2021 02:34 PM2021-05-08T14:34:05+5:302021-05-08T14:34:05+5:30

नुकतेच दिव्यांका त्रिपाठीने इंस्टाग्राम अकाउंटवर नवरा विवेक दहियासोबत रोमांस करतानाचे फोटो शेअर केले आहेत. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत दिव्यांका त्रिपाठीने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे तर विवेक दहियाने कुर्ता-पायजमा घातलेला दिसतो आहे.

या फोटोत दिव्यांका त्रिपाठीचा नवऱ्याकडे प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज चाहत्यांना भावतो आहे.

दिव्यांका त्रिपाठी लवकरच रिएलिटी शो खतरों के खिलाडीच्या ११व्या सीझनमध्ये दिसणार आहे. या शोचे शूटिंग केपटाउनमध्ये होणार आहे.

केपटाउनला पोहचताच दिव्यांका नवरा विवेक दहियाला मिस करते आहे.

दिव्यांका त्रिपाठीने आकाशवाणीमध्ये अँकर म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करत होती.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत मालिका बनू मैं तेरी दुल्हनमधून करिय़रची सुरूवात केली होती.

दिव्यांका त्रिपाठीचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर १४.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!