देवोलिना भट्टाचार्जीच्या या ग्लॅमरस फोटोंची रंगलीय चर्चा, लवकरच अडकणार आहे विवाहबंधनात

Published: May 6, 2021 06:00 AM2021-05-06T06:00:00+5:302021-05-06T06:00:02+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साथ निभाना साथियामधील गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्जी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला आहे.

देवोलीनाने मुलाखतीत सांगितले होते की, मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण मी पुढच्या वर्षी सर्व काही ठिक असेल तर लग्न करणार आहे. माझं मत अस आहे की, कोणतेही नाते टिकवण्यासाठी समजून घेण्याची गरज असते.

देवोलीना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

देवोलीनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

देवोलीना बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी चाहत्यांना त्यांच्या गोपी बहुचा एक वेगळा अवतार पहायला मिळाला होता.

देवोलिना 2022 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

देवोलिना खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड असून ती सोशल मीडियावर तिचे या अंदाजातील अनेक फोटो पोस्ट करत असते.

देवोलिनाला चांगलीच लोकप्रियता असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!