Bigg Boss 14: सारा गुरपालच्या डोळ्यांवर निक्की तांबोळीने नखांनी केला हल्ला, फोटो झाले व्हायरल

By अमित इंगोले | Published: October 15, 2020 12:24 PM2020-10-15T12:24:51+5:302020-10-15T12:31:29+5:30

Bigg Boss 14 : असे सांगितले जात आहे की, बिग बॉस १४ च्या एपिसोडची ही क्लिप एडीट करून काढण्यात आली आहे. पण तरी स्पर्धक याबाबत बोलताना दिसत आहेत.

Bigg Boss 14: सर्वात लोकप्रिय आणि सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १४ व्या सीझनमधील मोठी कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे. शोमध्ये सध्या दररोज काही गोंधळ, वाद सुरू आहेत. शोच्या पहिल्या आठवड्यातच स्पर्धक आपसात भिडल्याने बिग बॉसच्या घरातील सगळ्या गोष्टी बदलल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितले जात आहे की, निकी तांबोळीने टास्क दरम्यान आपल्या ऐक्रेलिक नखांनी सारा गुरपालवर हल्ला केला. सारा इम्युनिटी टास्ट दरम्यान बुलडोजरमध्ये बसली होती आणि निकी तिला तिथून उठवण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान निक्कीची नखे साराच्या डोळ्याला लागतील.

असे सांगितले जात आहे की, बिग बॉस १४ च्या एपिसोडची ही क्लिप एडीट करून काढण्यात आली आहे. पण तरी स्पर्धक याबाबत बोलताना दिसत आहेत.

त्यासोबतच सोशल मीडियावरही सारा गुरपालच्या जखमी डोळ्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. सारा गुरपाल डोळ्यांच्या उपचारासाठी घर आणि गेम सोडून बाहेर पडली आहे.

बिग बॉस १४ च्या घरात जिथे निक्कीचं पहिल्याच आठवड्यात चांगलं परफॉर्मन्स देण्यासाठी सीनिअर्ससोबतच सलमानकडून कौतुक केलं गेलं. तिला काही स्पेशल पॉवर्सही देण्यात आल्या.

तेच दुसरीकडे सारा शोमधून बाहेर पडलली. सारा गुरपालबाबत हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सारा मेडिकल कारणांमुळे घरातून बेघर करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये साराचा एक फोटो शेअर करण्यात आलाय. ज्यात साराच्या डोळ्याला झालेली जखम स्पष्ट दिसत आहे.

शोमध्ये हिना खान आणि गौहर खान बोलताना दिसल्या की, सारा कशाप्रकारे जखमी झाली होती. पण त्यांनी याबाबत तक्रार केली नाही आणि गेम चांगल्या प्रकारे खेळत राहिल्या.

तेच साराबाबत सांगितलं जात आहे की, तिच्यावर उपचार करण्यात आले आहे आणि ती सध्या तिच्या होमटाऊनला गेली आहे.

सोशल मीडियावर आता शोचे फॅन्स साराच्या जखमेबाबत बोलताना दिसत आहे आणि ती लवकर बरी होऊन शोमध्ये परत येईल अशी आशा करत आहे.