'बिग बॉस 14' फेम कविता कौशिक खऱ्या आयुष्यात आहे खूप स्टायलिश, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:34 AM2020-11-10T11:34:46+5:302020-11-10T11:34:46+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिक सध्या बिग बॉस १४मध्ये धुमाकूळ घालत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर टेलिव्हिजनपेक्षा कविता कौशिक खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १४मध्ये कविता कौशिकला एका आठवड्यानंतर बेघर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

खरेतर बिग बॉसच्या घरात तिला एजाज खानसोबत केलेल्या वर्तुणूकीमुळे ट्रोल केले होते. सोबतच सोशल मीडियावर लोकांनी खूप नाराजी व्यक्त केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मात्र आता कविता कौशिक बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

असे सांगितले जात आहे की कविताली ही संधी तेव्हा मिळेल जेव्हा ती स्पशेल सेलिब्रेटी पॅनेलला इंप्रेस करेल. (फोटो: इंस्टाग्राम)

या पॅनेलमध्ये विंदू दारा सिंग, आरती सिंग, काम्या पंजाबी आणि नागिन ५मधील मुख्य अभिनेत्री सुरभी चंदना गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

निर्मात्यांनी विकेंडचा वारचा प्रोमो रिलीज केला आहे.ज्यात सलमान म्हणतो आहे की, कविताला घरात एक सदस्याच्या रुपात पुन्हा एन्ट्री करण्याची सुवर्ण संधी मिळते आहे. पण या अटीवर की तुम्ही आमच्या स्पेशल सेलिब्रेटी पॅनेलला इंप्रेस करू शकाल.