कधी पाहिले नसतील भारती सिंहचे असे फोटो, चाहतेही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:25 PM2021-03-01T17:25:44+5:302021-03-01T17:36:35+5:30

छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्वीन भारती सिंह सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तूर्तास भारती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्वीन भारती सिंह सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तूर्तास भारती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

होय, तर सध्या भारतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत.

भारतीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात भारती कधी नव्हे ते बोल्ड पोज देताना दिसतेय.

आॅफ शोल्डर ड्रेसमध्ये भारती प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. भारतीच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेट्स वर्षाव केला आहे.

हातात लाल चुडा, ओठांवर गडद लाल रंगाचे लिपस्टिक, साजेसे दागिणे असा तिचा लूक आहे.

भारती सिं छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

भारती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. अशास्थितीत भारतीने लहानपणापासूनच काम सुरु केले.

रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली भारती आज मोठ्या मेहनतीने कोट्यावधीची मालकीण बनली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार भारती एका शोमधून सुमारे 7-8 लाखांची कमाई करते. तिला अ‍ॅवॉर्ड शो आणि इतर वेगवेगळ्या कार्यक्रम होस्ट करण्याची भली मोठी रक्कम दिली जाते.

विशेष म्हणजे भारती सिंह भारती सिंह टीवी कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी कलाकार आहे. टीव्ही कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या 100 इंडियन एंटरटेनर्स फोर्ब्सच्या यादीत भारतीचे नाव आहे.