तुम्हाला माहितीये का? शिल्पा शिंदेनं या एका अटीवर स्वीकारली होती अंगुरी भाभीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:00 AM2022-01-21T08:00:00+5:302022-01-21T08:00:04+5:30

Bhabhi Ji Ghar Par Hain, Shilpa Shinde : अंगूरी भाभीची भूमिका शिल्पा शिंदेने अशी काही वठवली होती की, आजही अंगूरी भाभी म्हटलं की, तिचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो.

अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेला कधीच रामराम ठोकला. पण तिने साकारलेली अंगुरी भाभी ही भूमिका आजही चाहते विसरू शकलेले नाहीत.

अंगूरी भाभीची भूमिका शिल्पा शिंदेने अशी काही वठवली की, आजही अंगूरी भाभी म्हटलं की, तिचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो.

पण या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा शिल्पाने निर्मात्यांपुढे काय अट ठेवली होती, माहितीये का?

सामान्यत: कुठलीही भूमिका ऑफर झाली की कलाकार पैशांबद्दल विचार करतो. अगदी जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करतो. पण शिल्पाची बातचं न्यारी. तिने या मालिकेसाठी भलतीच अट ठेवली होती. तिची ही अट ऐकून निर्मातेही चकित झाले होते.

मी भूमिका करायला तयार आहे. पण मला यासाठी खास ‘तकिया कलाम’ (हटके ओळ) पाहिजे असं तिने निर्मात्यांना म्हटलं होतं.

तिची ही अट मंजूर करत मालिकेच्या लेखकांनी ‘सही पकडे है’ हा तकिया कलाम तिला दिला. अंगुरी भाभीच्या तोंडचा ‘सही पकडे है’ हा डायलॉग किती लोकप्रिय आहे, हे वेगळं सांगायला नकोच.

आज अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘भाभी जी घर पे है’ या मालिकेचा भाग नाही. तिच्याजागी अभिनेत्री शुभांगी अत्रे ही भूमिका साकारतेय.

निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर 2016 साली शिल्पाने ‘भाभी जी घर पे है’ ही मालिका सोडली होती. या शोच्या निर्मात्यांवर शिल्पाने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हा शो सोडल्यानंतर शिल्पा ‘बिग बॉस’च्या 11 व्या सीझनमध्ये दिसली होती. हा शो तिने जिंकला होता.

बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करून ती चर्चेत आली. अलीकडे ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्ये झळकली. शिल्पाने करिअरमध्ये अनेक मालिका केल्यात, शो केलेत. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही.