संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांच्या लग्नाचे हे पहिले फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:14 PM2021-05-03T15:14:13+5:302021-05-03T15:32:59+5:30

संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांचे नुकतेच शुभमंगल पार पडलं असून आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या आहेत. पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा परा पडला.

नवदाम्पत्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यांत नवदाम्पत्याचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

रेशीमगाठीत अडकल्यानंतर त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटोही समोर आले आहेत.

नववधू बनलेली सुगंधाने तिच्या वेगवेगळ्या मूडमधले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नववधू सुगंधा मिश्राचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

मेहंदीपासून ते लग्नापर्यंत सुगंधाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले.

लेंहग्यामध्ये सुगंधाचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले होते.

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे.

संकेतला द कपिल शर्मा शोमध्येदेखील सुगंधानेच आणले होते.

तो या कार्यक्रमात केवळ काहीच भाग झळकला होता. त्याची मिमिक्री लोकांना खूपच आवडली होती.