मी स्वत:ला निवडलं..., अनुषा दांडेकरनं सांगितलं करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपमागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:29 PM2021-09-27T14:29:38+5:302021-09-27T14:39:27+5:30

टेलिव्हिजन होस्ट, व्हीजे अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रा एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण आताश: दोघांचं ब्रेकअप झालंय...

टेलिव्हिजन होस्ट, व्हीजे अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रा एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण आताश: दोघांचं ब्रेकअप झालंय.

गेल्या वर्षी जानेवारीत अनुषा आणि करणच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. पण सुरुवातीला दोघांनीही या चर्चा नाकारल्या होत्या. पण नंतर खुद्द अनुषानेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं होतं.

करण कुंद्राने माझी फसवणूक केली पण आजपर्यंत या गोष्टीसाठी माफी मागितली नाही, असा खुलासा तिनं केला होता.

आता पुन्हा एकदा अनुषाने करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपमागचं खरं कारण सांगितलं आहे. आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ती यावर बोलली.

मला तुमच्या ब्रेकअपचं खरं कारण सांगशील का? असा प्रश्न एका चाहत्यानं केलं. या प्रश्नाकडे अनुषा दुर्लक्ष करेल, असा अंदाज होता. पण अनुषाने त्यावर अगदी खरं उत्तर दिलं.

आपल्याला आयुष्यात अधिक प्रामाणिकपणा, अधिक आनंद आणि प्रेम हवं असतं आणि मला वाटतं याची सुरूवात स्वत:पासूनच होते. म्हणून मी स्वत:ला निवडलं... बस इतकंच, असं उत्तर तिने दिलं.

सध्या अनुषा अश्रिनेता जेसन शाहला डेट करत असल्याची चर्चा आहे. करण कुंद्रा मात्र अद्यापही सिंगल आहे. लवकरच तो ‘बिग बॉस 15’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे.

अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.