PICS : आत्ताच्या ‘बबड्या’बद्दल थोडं खास...! असा आहे अद्वैत दादरकरचा प्रेरणादायी प्रवास

Published: May 6, 2021 05:30 PM2021-05-06T17:30:17+5:302021-05-06T17:52:46+5:30

बबड्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

हो, आज नव्या बबड्याचा वाढदिवस. अर्थात ‘अग्गंबाई सुनबाई’मधील बबड्या म्हणजेच अभिनेता व दिग्दर्शक अद्वैत दादरकर याचा वाढदिवस.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत सोहम अर्थात बबड्याची भूमिका आशुतोष पत्कीने साकारली होती. मात्र ‘अग्गंबाई सुनबाई’ याा मालिकेत ही भूमिका अद्वैतच्या वाट्याला आली आहे.

अद्वैतच मराठी नाट्यक्षेत्रात देखील खूप योगदान आहे. काही सिनेमांमध्येही त्याने भूमिका केल्या आहेत.

मुंबईतील दादरमध्ये अद्वैतचा जन्म झाला. बालमोहन विद्यामंदीर या शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात रस होता. कॉलेजात गेल्यावर अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रातच करिअर करायचे हा त्याचा निर्णय पक्का झाला.

कॉलेजात असताना अनेक एकांकीका स्पर्धा गाजवत असतानाच त्याने अनेक नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. शिक्षण संपले आणि त्याने या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले.

रंगभूमीवर त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शन काम केले. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला..

अद्वैतची पत्नी भक्ती देसाई ही सुद्धा अभिनेत्री आहे. अनेक नाटकात आणि काही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

अद्वैत आणि भक्ती कॉलेज जीवनापासूनच एकमेकांना ओळखतात. कॉलेजात असताना अद्वैत नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची़ यादरम्यान त्यांची भेट झाली.

या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे त्यांनी लग्न केले. अद्वैत व भक्ती यांना एक मुलगी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!