आमना शरीफने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:44 PM2021-05-15T14:44:56+5:302021-05-15T14:44:56+5:30

नुकतेच आमना शरीफने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोत आमना शरीफने खास अंदाजात लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमना शरीफचा अंदाज तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

या फोटोत आमना शरीफ व्हाइट आउटफिटमध्ये सुंदर दिसते आहे.

आमनाने लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे.

याशिवाय आमना जंक्शन, आलू चाट, आओ विश करें शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटात झळकली आहे.

आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही सिनेमातही झळकली आहे.

आमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते.

आमना शरीफचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.