'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेने पेशवाई नववारी साडीत केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:24 PM2021-06-15T18:24:59+5:302021-06-15T18:46:42+5:30

लाल नववारी साडीत रुपाली भोसले दिसली लय भारी

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसलेने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

रुपाली भोसलेने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल नववारी साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.

लाल नववारी साडीत रुपाली भोसले खूपच सुंदर दिसते आहे.

रुपालीच्या या लेटेस्ट फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

लाल साडीत नाकात नथ, कानात झुमके आणि नेकलेसने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.

रुपाली भोसलेचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

रुपाली भोसले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये पहायला मिळते आहे.

रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

रुपाली भोसलेने साकारलेली संजनाची भूमिका निगेटिव्ह असली तरी तिच्या भूमिकेला पसंती मिळते आहे.

रुपाली भोसलेला बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!