Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:29 PM2023-02-14T18:29:46+5:302023-02-14T19:48:32+5:30

Jai Vilas Palace: पाहा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या 'जय विलास पॅलेस'चे इनसाइड फोटोज...

Jyotiraditya Scindia: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया नेहमी चर्चेत राहणारं व्यक्तीमत्व आहे. विशेष म्हणजे, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह त्यांचे घरही अनेकदा चर्चेत आले आहे. सिंधिया यांचे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये अतिशय आलिशान घर असून, सिंधियांचे संपूर्ण कुटुंब याच राजवाड्यात राहतात.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे शाही घर 'जय विलास पॅलेस' नावाने ओळखले जाते. हा राजवाडा 1874 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पणजोबा जयाजीराव सिंधिया यांनी बांधला होता. आज आम्ही तुम्हाला ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आलिशान 'जय विलास पॅलेस'च्या आतील फोटो दाखवणार आहोत.

ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया हे सिंधिया घराण्याचे राजपुत्र आहेत. सध्या ते भारत सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया पत्नी प्रियदर्शनी राजे सिंधिया आणि मुले महानारायण सिंधिया, अनन्या राजे सिंधिया यांच्यासोबत या राजवाड्यात राहतात.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2001 मध्ये त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसमधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुमारे 20 वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2020 मध्ये भाजपशी हातमिळवणी केली. 2021 मध्ये पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर त्यांची नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जय विलास पॅलेस हा 19व्या शतकातील महल आहे, ज्याची स्थापना 1874 मध्ये जयाजीराव सिंधिया यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे केली होती. भारत भेटीवर आलेल्या प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस मेरी ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी 1867 मध्ये हा राजवाडा बांधण्यात आला होता.

सिंधिया घराण्याने एकेकाळी ग्वाल्हेरवर राज्य केले आणि आजही या कुटुंबातील सदस्यांना शहरात राहणारे लोक खूप आदर करतात. आता राजवाड्याचा काही भाग "जिवाजीराव सिंधिया म्युझियम" मध्ये रूपांतरित झाला आहे आणि उर्वरित वाड्यात कुटुंबीय राहतात.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घराचा काही भाग म्युझियम विंग म्हणून विकसित करण्यात आला आहे. 400 खोल्यांपैकी 35 खोल्यांचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. आजच्या काळात जय विलास पॅलेसची किंमत सुमारे 4500 कोटी रुपये आहे.