PHOTOS : मलायका अरोराची डुप्लिकेट असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 06:36 PM2020-02-26T18:36:17+5:302020-02-26T18:38:19+5:30

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ.

वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नाही.

हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

हिना सध्या छोट्या पडद्यावर नुकतीच झालेली मालिका मुझसे शादी करोगीमध्ये कंटेस्टंट म्हणून पहायला मिळते आहे.