कुणी काम देतं का हो काम ?, मराठीतील 'या' प्रसिद्ध नवविवाहीत अभिनेत्रीवर आलीय काम मागण्याची वेळ

Published: May 19, 2021 07:00 AM2021-05-19T07:00:00+5:302021-05-19T07:00:02+5:30

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२०मध्ये फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नबेडीत अडकली आहे. (Photo Instagram)

राजेश करमारकर हा प्रसिद्ध फोटोग्राफर असून त्याने खूप साऱ्या मराठी कलाकारांचे फोटोशूट केले आहे.. (Photo Instagram)

लग्नानंतर मात्र आता तिने कला क्षेत्रात पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. तिला कलाकविश्वात काम करण्याची इच्छा आहे. . (Photo Instagram)

शाश्वतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने काम मागितले आहे. . (Photo Instagram)

शाश्वती सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, “नमस्कार, माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरिअल, वेबसीरीज करु इच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा ”. (Photo Instagram)

बालक पालक हा शाश्वतीचा पाहिलाच चित्रपट. हा चित्रपट तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. (Photo Instagram)

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बालक पालक या चित्रपटात शाश्वतीने डॉली ही महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती. (Photo Instagram)

बालक पालक चित्रपटानंतर नंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. (Photo Instagram)

शाश्वतीचा जन्म पुण्यात झाला असून ती लहाणाची मोठी देखील पुण्यातच झाली. (Photo Instagram)

बालपणापासूनच तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!