Hotness Overloaded...! मराठीतील ही अभिनेत्री देतेय मलायकाला बोल्डनेसमध्ये टक्कर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 07:15 AM2019-06-20T07:15:00+5:302019-06-20T07:15:00+5:30

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे.

मलायका जितकी हॉट आणि बोल्ड आहे, तितकीच हिनाही हॉट आणि बोल्ड आहे.

एका इव्हेंटमध्ये हिना व मलायका एकमेकांसमोर आल्या होत्या. हिनाला पाहून स्वत: मलायकाही अवाक् झाली होती.

हिनाचे सोशल मीडियावरील फोटो खूप बोल्ड आहेत.