Birthday Special: एका प्रेमाची इंटरेस्टींग गोष्ट, आदिनाथ-उर्मिलाची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Published: May 13, 2021 06:00 AM2021-05-13T06:00:00+5:302021-05-13T06:00:00+5:30

त्याने तिला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीनबोल्ड केलं. तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेता आदिनाथ कोठारेची. आदनाथच्या आज वाढदिवस आहे.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे ही मराठीतली सर्वाधिक क्युट आणि तितकीच रोमँटीक जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असून दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.

रेशीमगाठीत अडकण्याआधी आदिनाथ आणि उर्मिला खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

९ वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या आदिनता आणि उर्मिलाची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.आदिनाथला उर्मिला पाहताक्षणी आवडली विशेष म्हणजे तिचा साधेपणा आदिनाथला अधिक भावला.

'शुभ मंगल सावधान' हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांना तो या चित्रपटासाठी असिस्ट करत होता.

'शुभमंगल सावधान' या चित्रपटासाठी महेश कोठारे नवीन चेहऱ्याचा शोध घेत होते. त्यासाठी उर्मिला त्यांच्या घरी गेली होती.तेव्हा आदिनाथ नुकताच झोपून उठला होता. झोपेतून उठताच सगळ्यात आधी त्याने उर्मिलाला पाहिले आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटीगाठी सुरुच होत्या. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते.

नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली होती अशा रोमँटीक वातावरणात दोघांची डेट खास ठरली. हळूहळू दोघांचं प्रेम खुलू लागलं अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.

२२ डिसेंबर २०११ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. या कपलला मुलगी असून जीजा असे तिचे नाव आहे. आदिनाथ आणि उर्मिला दोघेही लेकीसह मजा मस्ती करताना दिसतात.

उर्मिला खंबीरपणे आदिनाथच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. लग्नाच्या नऊ वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. दोघेही एकमेकांचे रोमँटीक फोटो शेअर करताना दिसतात.

पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू उर्मिला आणि आदिनाथ या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!