ये घर बहुत हसीन है, खूपच सुंदर आहे हेमांगी कवीचे घर, पहिल्यांदाच बघा Inside Photo

Published: June 10, 2021 02:25 PM2021-06-10T14:25:47+5:302021-06-10T14:31:41+5:30

मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच ईच्छा असते. सर्वसामान्यापासून ते सेलिब्रेटीपर्यंच सारेच आपले ड्रिम हाऊसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. अभिनेत्री हेमांगी कवीच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेमांगीने सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी हेमांगीने प्रचंड मेहनत केली आहे. हेमांगी कवीने मुंबईत काही वर्षापूर्वीच हा सुंदर फ्लॅट खरेदी केला.

घर घेतल्याचा आनंद तिने चाहत्यांसही शेअर केला होता. मुंबईत घर घेणे हेमांगीसाठी तितके सोपे नव्हते. घर घेण्यासाठी केलेला संघर्षामुळेच तिचे स्वप्न पूर्ण झाले.

तिचा आनंद शेअर करताना तिने सांगितले होते की,मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं.

तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. पोजेशेनचे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारीमध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला.

त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्चमध्ये कोरोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. 4 महिने साताऱ्याला राहून आम्ही जून मध्ये आमच्या या नवीन घरात परतलो.

पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.

पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही व्यस्त असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं.

अशा प्रकारे नवीन घरात पहिल दिवाळी साजरी करतानाचा आनंद शेअर केला होता.आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा केल्याचा भावना तिने चाहत्यांसह शेअर केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!