एखाद्या शहराइतकंच मोठं आहे पॉपस्टार मायकल जॅक्सनचं हे घर, आतील नजारा बघून उडेल तुमची झोप....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:59 AM2020-12-17T10:59:43+5:302020-12-17T11:22:14+5:30

२००९ साली मायकलचं निधन झालं. पण त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. यावरून तो किती महान कलाकार होता हे दिसून येतं.

दिवंगत मायकल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय पॉपस्टार म्हणून ओळखला जातो. आजही तो आपल्यात नसला तरी त्याची गाणी आणि त्याची डान्सची स्टाइल लोकांच्या मनात घर करून आहेत.

२००९ साली मायकलचं निधन झालं. पण त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. यावरून तो किती महान कलाकार होता हे दिसून येतं. मायकल जॅक्सनच्या सर्वच वस्तूंची चर्चा होत असते. त्यात त्याच्या आलिशान घराची चर्चा नेहमीच होते.

मायकल जॅक्सनचं घर कॅलिफोर्नियातील लॉस ओलीव्हस या ठिकाणी २ हजार ७०० एकर परिसरात आहे. तर 'नेव्हरलँड रेंच' असं मायकलच्या घराचं नाव आहे.

१९८१ साली विल्यम बोन यांच्याकडून ३ कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्सला त्याने ही जमीन खरेदी केली होती. १९८८ ते ९१ या केवळ तीन वर्षात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन मायकलनं आपल्या आलिशान घराची निर्मिती केली.

मायकलचं घर हे सेलिब्रिटींसारखा आलिशान बंगला किंवा हवेली नाही तर जणू त्याने नेव्हरलँडमध्ये एक शहरच वसवलं होतं. मायकलच्या नेव्हरलँड नामक या लहानशा शहरात जाण्यासाठी पाच किलोमीटरचा गेट आहे.

मायकलच्या नेव्हरलँडमध्ये नदी, तलाव, जंगल, एक लहानसं प्राणी संग्रहालय, भलीमोठी बाग, चित्रपटगृह, हॉटेल्स अगदी एखाद्या शहरात ज्या सुखसोई असतात त्या सर्व आहेत.

यात जवळपास आठ किलोमीटर मोठी आहे. या हवेलीमध्ये ५० पेक्षा जास्त आलिशान खोल्या, वाचनालय, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा आहेत. मायकलच्या या आलिशान घराची किंमत आज ३ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.