OMG! एका ‘किस’मुळे काइली जेनर बनली अब्जाधीश, इंटरेस्टिंग आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 04:05 PM2021-06-20T16:05:59+5:302021-06-20T16:13:06+5:30

हॉलिवूड अभिनेत्री काइली जेनर आज अब्जाधीश आहे. अतिशय लहान वयात काइलीने तिचा बिझनेस सुरू केला आणि बघता बघता सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या यादीत टॉपवर पोहोचली.

हॉलिवूड अभिनेत्री काइली जेनर (kylie jenner ) आज अब्जाधीश आहे. अतिशय लहान वयात काइलीने तिचा बिझनेस सुरू केला आणि बघता बघता सर्वाधिक कमाई करणाºया सेलिब्रिटींच्या यादीत टॉपवर पोहोचली.

वयाच्या उण्यापुºया 19 व्या वर्षी काइलीने ‘काइली लिप किट’ नामक लिपस्टिक लाईन सुरु केली होती. पुढे तिच्या या कॉस्मेटिक लाईनचे नाव बदलून ‘काइली कॉस्मेटिक’ करण्यात आले.

काइलीने या कॉस्मेटिक लाईनची सुरूवात का केली, यामागचे कारण फारच इंटरेस्टिंग आहे.

ताज्या मुलाखतीत खुद्द तिने हा खुलासा केला आहे. तर काइलीने या कॉस्मेटिक लाईनची सुरूवात केली ती तिच्या लो कॉन्फीडन्समुळे.

होय, काइलीचे ओठ खूप लहान होते. पण पहिल्या किसआधीपर्यंत तिने याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

तिच्या पहिल्या बॉयफ्रेन्डने तिला पहिला किस केला. तू चांगली किसर आहेस. पण यार, तुझे ओठ खूपच लहान आहेत, अशी तिच्या या बॉयफे्रन्डची पहिल्या किसनंतरची पहिली प्रतिक्रिया होती.

झाले, बॉयफ्रेन्डची ती गोष्ट काइलीच्या जिव्हारी लागली. ओठ लहान आहेत म्हटल्यावर इथूनच तिने लिप फिलर्सचा वापर सुरू केला.

याचदरम्यान तिने तिची कॉस्मेटिक लाईन सुरू केली. 23 वर्षांची काइली आज याच बिझनेसच्या भरवशावर अब्जाधीश आहे.

काइली सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 24 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली काइली रोज नवे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!