Kim Kardashian च्या आईनेच लीक केली होती तिची सेक्स टेप, एक्स बॉयफ्रेन्डने सांगितलं सगळं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:51 PM2022-05-06T12:51:22+5:302022-05-06T13:01:03+5:30

Ray j on Kim Kardashian sex tape : तो म्हणाला की, 'मी १४ वर्षापासून पडद्यामागेच होतो आणि कर्दाशियां परिवार त्याच्या नावाचा वापर करत होता. १५ वर्षापासून ते नावाचा वापर करून अब्जो डॉलर कमवत आहेत.

किम कर्दाशियां (Kim Kardashian) पुन्हा एकदा तिच्या सेक्स टेपमुळे चर्चेत आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर किमचा एक्स बॉयफ्रेन्ड रे जे (Ray J) ने याबाबत वक्तव्य केलं. रे ने याप्रकरणी बोलताना सांगितलं की, त्याने कधीही सेक्स टेप लीक केली नव्हती. उलट त्याची किमची आई क्रिस जेनरसोबत डील झाली होती.

२००७ मध्ये लीक झालेल्या या सेक्स टेपबाबत रे जे म्हणाला की क्रिस जेनर आणि किम कर्दाशियांसोबत त्याची डील आणि पार्टनरशिप झाली होती. या गोष्टीचा खुलासा रे ने किम तिचा शो द कदार्शियांवर रडल्यावर केला.

गेल्या आठवड्यात किम कर्दाशियां तिचा नवा रिअॅलिटी शो सेक्स टेपबाबत बोलताना रडताना दिसली होती. गेल्यावर्षी शूट झालेल्या या एपिसोडमध्ये किमचा एक्स पती कान्ये वेस्टच्या हाती तिची फेमस सेक्स टेप लागली होती. याबाबत किम शोवर इमोशनल होताना दिसली होती.

डेली मेलबाबत बोलताना रे जे म्हणाला की, त्याच्याकडे किमसोबत तयार केलेल्या सेक्स टेपची कोणतीही कॉपी नव्हती. तो म्हणाला की, 'मी १४ वर्षापासून पडद्यामागेच होतो आणि कर्दाशियां परिवार त्याच्या नावाचा वापर करत होता. १५ वर्षापासून ते नावाचा वापर करून अब्जो डॉलर कमवत आहेत. मी यावर याआधी कधीही बोललो नाही'.

तो पुढे म्हणाला की, 'मी कधी काही लीक केलं नाही. मी कधीही कोणती सेक्स टेप लीक केली नाही. क्रिस जेनर, किम आणि माझ्यात डील आणि पार्टनरशिप झाली होती. आम्ही नेहमीच याबाबत सुरूवातीपासून पार्टनर होतो'.

रे जे म्हणाला की, सेक्स टेप पोस्ट करण्याची आयडिया त्यांची होती. त्यांनी किमला हा सल्ला दिला होता. यानंतर किमने तिची आई क्रिस जेनरला हे सांगितलं आणि क्रिसने विविड एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली ही सेक्स टेप रिलीज करण्याची व्यवस्था केली. रे म्हणाला की, किम आणि तिने तीन व्हिडीओचा कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता.

रे जे नुसार, त्याने किमसोबत तीन व्हिडीओ शूट केले होते. यातील एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला होता. तो म्हणाला की, 'माझ्या यातील एकही व्हिडीओ नव्हता. त्यांच्या घरीच सगळे व्हिडीओ होते. घरात नायके शूजच्या डब्यात पलंगाखाली त्या टेप्स ठेवल्या होत्या'.

तो म्हणाला की, मला आत्महत्या करावी वाटत होती. कारण तुम्हाला माहीत असतं की, सत्य काय आहे आणि तुम्ही खोटं बोलून त्यातून लोकप्रियता मिळवता याने दु;खं होतं. याने त्या सर्व कलाकारांचा अपमान होतो जे आपल्या कौशल्याने आणि इमानदारीने काम करतात'.

कान्ये वेस्टला भेटण्याबाबत रे जे म्हणाला की, त्याने कान्ये वेस्टला कोणतीही सेक्स टेप दिली नव्हती. रे जे म्हणाला की, त्याने कान्येला एक डिवाइस दिलं होतं ज्यात त्याचे किमसोबतचे काही इंटिमेट फोटो आणि मिनी व्हिडीओ होते. हे सगळे किमसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाचे आहेत.