'कुणीही माझं शरीर विना कपडे बघू शकत होते', न्यूड फोटो लीक झाल्यावर अभिनेत्री ट्रॉमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:59 PM2021-11-24T17:59:58+5:302021-11-24T18:13:43+5:30

Jennifer Lawrence talked about her Leaked Nude Pics : काही वर्षाआधी हॅकर्सनी जेनिफर लॉरेन्सचे न्यूड फोटो लीक केले होते. तिचं नाव २०१४ च्या स्कॅंडलमध्ये होतं. ज्यात जेनिफरसोबत रिहाना आणि सेलेना गोम्जसारख्या मोठ्या सेलिब्रिटींचे न्यूड फोटो लीक झाले होते.

बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे कॉन्ट्रोवर्सी. काही सेलिब्रिटींच्या कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या आयुष्यातून निघून जातात. पण काहींच्या बाबतीत तसं होत नाही. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स जी सध्या प्रेग्नेन्सीमुळं चर्चेत आहे. तिच्यावरही एका वादाचा खोलवर प्रभाव पडला, जो सात वर्षांनंतरही तिच्या आयुष्यात आहे. जेनिफरने एका मुलाखतीत तिच्या लाईफमधील भीतीबाबत वक्तव्य केलंय.

काही वर्षाआधी हॅकर्सनी जेनिफर लॉरेन्सचे न्यूड फोटो लीक केले होते. तिचं नाव २०१४ च्या स्कॅंडलमध्ये होतं. ज्यात जेनिफरसोबत रिहाना आणि सेलेना गोम्जसारख्या मोठ्या सेलिब्रिटींचे न्यूड फोटो लीक झाले होते.

जेनिफरने व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'त्यावेळी कुणीही विना कपडे माझ्या शरीराला बघू शकत होतं, माझ्या परवानगीशिवाय, दिवसाच्या कोणत्याही वेळी. फ्रान्सच्या एका व्यक्तीने ते फोटो लीक केले होते. माझा हा ट्रॉमा आयुष्यभर राहणार आहे'.

हॅकर्सन जेनिफरचं अकाऊंट हॅक केलं आणि मग तिचे आय क्लाउड हॅक करून तिचे प्रायव्हेट फोटो मिळवले होते. या स्कॅंडलमध्ये रिहाना आणि सेलेन गोम्ज यांचेही फोटो लीक झाले होते. सोबतच Ariana Grande, विक्टोरिया जस्टिस, केट अपटनचंही अकाऊंट हॅक केलं होतं.

स्कॅंडलनंतर अभिनेत्री म्हणाली होती की, 'मी पब्लिक फिगर आहे, एक अभिनेत्री आहे म्हणून याचा अर्थ हा नाही की, मला हे सगळं हवं होतं. हे माझं शरीर आहे. माझी चॉईस आहे. पण इथे तर तथ्य हे आहे की, ही माझी चॉईश नव्हती जी सर्वात खराब आहे'.

जेनिफरने मुलाखतीत हे मान्य केलं की, २०१७ मध्ये एका फ्लाइट इंजिन फेलिअरने तिला कमजोर बनवलं होतं. पण या धक्कादायक घटनेनंतरही तिला दुसरी फ्लाईट पकडावी लागली'.

ती म्हणाली की, 'आम्ही सगळे बस मरणारच होतो. मी माझ्या परिवाराला वेड्यासारखे व्हॉइसमेल्स करू लागले होते. म्हणत होती की, माझं आयुष्य फार शानदार होतं. मला माफ करा'. जेनिफरसोबत घडलेल्या या घटनेने तिला आतून हलवलं होतं.

जेनिफर आणि तिचा पती Cooke Maroney लकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. अभिनेत्री नुकतीच अभिनेता लिओनार्डो डिकाप्रियोसोबत लॉस एंजलिसमध्ये एका सिनेमाच्या स्क्रीनिंगमद्ये दिसली होती. यावेळी जेनिफरचं बेबी बंप स्पष्टपणे दिसत होतं.

Read in English