'गेम ऑफ थ्रोन'च्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, 'या' व्यक्तीने Adult Toy ने केलं होतं लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 11:04 AM2021-02-13T11:04:45+5:302021-02-13T11:13:34+5:30

Esme Bianco ने आरोप केला आहे की म्यूझिशिअन मॅरीलिन मॅनसनने तिचं लैंगिक शोषण(Sexual Harassment) केलं आहे.

एचबीओची लोकप्रिय वेबसीरीज गेम ऑफ थ्रोन्समध्ये(GOT) काम केलेली अभिनेत्री इस्मे बियांकोने(Esme Bianco) एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशामुळे हॉलिवूडमध्ये(Hollywood) एकच खळबळ माजली आली आहे.

Esme Bianco ने आरोप केला आहे की म्यूझिशिअन मॅरीलिन मॅनसनने तिचं लैंगिक शोषण(Sexual Harassment) केलं आहे.

अभिनेत्री Esme Bianco म्हणाली की, म्युझिशिअन मॅरीलिन मॅनसन एक राक्षस आहे. त्याने माझ्यासोबत अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.

ती म्हणाली की, मॅनसनने तिला अनेकदा टॉर्चर केलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. हा खुलासा तिने एका खाजगी मॅगझिनसोबत बोलताना केला आहे.

इस्मेने सांगितले की, एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्यादरम्यान मॅनसनसोबत तिची भेट झाली होती. मॅनसनने तिच्यासोबत मारहाण केली. तिचे पाय केबलने बांधले आणि तिला इलेक्ट्रिक एडल्ट टॉयच्या मदतीने तिचं लैंगिक शोषण (Sexual Harassment) केलं.

अभिनेत्री इस्मेने सांगितले की, म्युझिक व्हिडीओच्या तीन दिवसाच्या शूटींग दरम्यान मॅनसनने तिला झोपू दिलं नाही.

त्यावेळी मॅनसनने तीन वाजेपर्यंत जेवणाऐवजी फक्त कोकेन दिलं. इस्मेने सांगितले की, मॅनसनने तिची परवानगी न घेता तिच्या शरीरावर अनेकदा चावाही घेतला.

इस्मेने सांगितले की, त्यावेळी मी मॅनसनच्या इच्छेविरूद्ध एकही कपडा घालू शकत नव्हते. तो मला सांगत होता की, काय घालायचं काय नाही. मला असं वाटत होतं की, मी एका तुरूंगात आहे.

अभिनेत्री इस्मेने पुढे सांगितले की, मॅनसनपासून दूर गेल्यानंतर तिला फार जास्त मानसिक त्रास झाला.

दुसरीकडे मॅनसनने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मॅनसन म्हणाला की, इस्मेसोबत जे काही झालं त्यात तिची सहमती होती.