OMG!! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर सुपरमॉडेल बेला हदीदचा ‘रिस्की’ लुक, नेकलेस पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:03 PM2021-07-12T17:03:23+5:302021-07-12T17:16:31+5:30

cannes 2021 : कान्स फिल्म फेस्टिवल 2021 च्या रेड कार्पेटवर सुपर मॉडेल बेला हदीदने एन्ट्री घेतली आणि सर्वांच्या नजरा तिच्या नेकलेसवर खिळल्या.

कान्स फिल्म फेस्टिवल 2021 च्या रेड कार्पेटवर सुपर मॉडेल बेला हदीदने एन्ट्री घेतली आणि सर्वांच्या नजरा तिच्या नेकलेसवर खिळल्या.

कान्सच्या दुस-या दिवशी बेलाने स्वत:साठी एका ‘रिस्की’ आऊटफिटची निवड केली. इतका ‘रिस्की’ की पाहणारे हैराण होतील.

Schiaparelli ब्लॅक ड्रेसमध्ये बेला रेड कार्पेटवर उतरली. तिचा ड्रेस एलिगेंट होता. पण नेकलेस एकदम भारी. काळ्या रंगाच्या आऊटफिटसोबत बेलाने गोल्डचा नेकलेस घातला होता.

हा नेकलेस पाहिल्यानंतर लंग्स म्हणजेच फुफ्फुसाची आठवण यावी. डेनिअल रायनोस्टोन्सने तिचा हा आगळावेगळा आणि हटके नेकलेस डिजाईन केला होता.

तूर्तास कान्सच्या रेड कार्पेटवरील बेलाचे या लुकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बेला हदीद ही सुपरमॉडेल जीजी हदीदची छोटी बहीण आहे. तिची आई योलांडा ही सुद्धा कधीकाळी सुपरमॉडेल होती.

बेलाचा लहान भाऊ अनवर हदीद हाही मॉडेलिंग दुनियेत सक्रिय आहे आणि त्याचे मोठे नाव आहे.

तूर्तास बेला हदीद तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहेत. बेला आर्ट डायरेक्टर Marc Kalman ला डेट करत असल्याची चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!