IN PICS : 8 बॉयफ्रेन्ड आणि 3 लग्नं; तरीही आज एकाकी आहे अँजेलिना जोली...!!

Published: June 4, 2021 01:59 PM2021-06-04T13:59:03+5:302021-06-04T14:31:57+5:30

Birthday Special Angelina Jolie : अँजेलिना आज सुपरस्टार आहे. पण एकाकी आयुष्य जगतेय.

अँजोलिना जोली हे अनेक सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणारे नाव आहे. आज तिचा वाढदिवस. लुकिंग टू गेट आऊट या सिनेमातून अँजेलिनानं बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. ती एका वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला होता.

अँजेलिना लहानपणी फारच हट्टी स्वभावाची होती. या हट्टीपणामुळे तिला शाळेतून देखील काढून टाकण्यात आलं होतं. तिनं पाच वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण पूर्ण केलं.

अँजेलिना आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. पण खरं तर तिला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. तिला चक्क फ्यूनरल डायरेक्टर व्हायचं होतं. म्हणजे अशी व्यक्ती जी शवघरांत मृत शरीरांची देखरेख करते.

तिच्या आई आणि भावाने तिचा सांभाळ केला होता. अँजेलिनाला सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता. ती मोठी होत होती तेव्हा आई सोबत सिनेमा पाहण्यासाठी जात असायची. यानंतर तिला सिनेमाचे हे विश्व आवडू लागले. मॉडेलिंगला सुरुवात केली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. तिनं 1995 साली ‘हॅकर्स’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

अँजेलिना, जॉनी मिलरसोबत 28 मार्च 1996 मध्ये विवाहबद्ध झाली. हे तिचे पहिले लग्न. 1995 साली हॅकर सिनेमा आला होता. यावेळी शुटींगदरम्यान दोघे प्रेमात पडले. दोघांनी लग्नही केले. परंतु 3 फेब्रुवारी 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले.

पहिला घटस्फोट झाल्यानंतर अँजेलिना अभिनेता बॉब थॉर्नटनसोबत विवाहबद्ध झाली. हे लग्न देखील जास्त काळ टिकलं नाही. 2003 मध्ये अँजेलिना आणि बॉब दोघं वेगळे झाले.

यानंतर अँजेलिना आणि ब्रॅड पिट यांच्या अफेअरच्या चर्चेला 2005 साली उधाण आले होते. अनेक वर्षे अँजेलिना आणि ब्रॅड लिव्हइनमध्ये राहिले. पुढे तिनं ब्रॅड पीटसोबत तिसरं लग्न केलं.

पुढे ब्रॅडला देखील तिनं घटस्फोट दिला. सध्या अँजेलिना आपल्या मुलांसोबत रहाते.

अँजेलीनाने अधिकृतरित्या तीन लग्न तर केलीच पण दरम्यानच्या काळात तिचे आठ बॉयफ्रेंडदेखील होऊन गेले आहेत.

आता ती अमेरिकन व्यवसायिक फिलेन्थ्रॉपिस्टसोबत चौथं लग्न करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!