भूत नव्हे किम...! ‘ मेट गाला 2021’च्या रेड कार्पेटवरचे हे अतरंगी ड्रेस पाहून डोक्यावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:47 PM2021-09-14T13:47:07+5:302021-09-14T14:18:25+5:30

Met Gala 2021 Red Carpet : कोरोना व्हायरसमुळे गेल्यावर्षी फॅशन जगतातील सर्वात मोठा इव्हेंट रद्द झाला होता. पण यावर्षी हा इव्हेंट चांगलाच रंगला आणि अतरंगी फॅशनचे एक एक नमुने या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. आम्ही बोलतोय ते मेट गाला 2021 या इव्हेंटबद्दल.

न्यूयॉर्कमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये किम कर्दाशियांपासून जेनिफर लोपेज, मेगन फॉक्ससह अनेक हॉलिवूड स्टार रेड कार्पेटवर उतरले. त्याच्या अतरंगी अवताराची चर्चा होणार नाही तर नवल.

भूत नव्हे किम... सर्वात कहर केला तो किम कर्दाशियांने. तिचा अवतार पाहून सगळेच थक्क झालेत. ममी सारखा ड्रेस घालून ती रेड कार्पेटवर उतरली.

किम कर्दाशियांच्या या लुकची प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर तर मीम्सचा जणू पाऊस पडला.

लील नॅक्स एक गोल्डन सुपरहिरो बनून रेड कार्पेटवर अवतरला. त्याच्या ड्रेसची चर्चा झाली नसेल तर नवल.

आता हा गाऊन बघाच. किम पेट्रॉस अशी ‘हॉर्स गर्ल’ बनून रेड कार्पेटवर आली. घोड्याचं डोकं असलेला तिचा हा गाऊन पाहून सगळेच अवाक झालेत.

एरिकाह बादू हिचा हा ड्रेस पाहा, यालाही फॅशनच म्हणतात.

रॅपर ASAP Rockyचा हा लुकही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याच्या लुक पाहून अनेकांना हसू आवरता आले नाही.

गायक आणि गीतकार Frank Ocean हा असं काही रोबोटिक बाहुलं घेऊन रेड कार्पेटवर उतरला. त्याच्यापेक्षा त्याच्या बाहुल्याचीच जास्त चर्चा झाली.

क्लेयर एलिस बाऊचर जिला ग्रिम्स नावाने ओळखले जाते, ती बया हातात तलवार घेऊन रेड कार्पेटवर उतरली.

सोनेरी चंदेरी रंगाचा पिसारा बनून आलेली ही इमान. ती हॅरीस रीडने डिझाईन केलेला असा अतरंगी ड्रेस घालून रेड कार्पेटवर आली.

कॉमेडी अ‍ॅक्टर पिटे डेव्हिनसनचा हा अवतार बघाच

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English