IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) भिडणार आहेत.

Indian Premier League 2020चे वेळापत्रक ( Time Table) जाहीर होण्यापूर्वी क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर बीसीसीआयनं मागील रविवारी IPL 2020 Schedule जाहीर केलं. येत्या शनिवारपासून IPL 2020ला सुरुवात होणार आहे.

पण, आता या पहिल्या सामन्यापेक्षा एका सुंदरीची अधिक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रथमच आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. त्यासाठीही BCCIने रेकॉर्डेड प्रेक्षकांचे आवाज स्टेडियमवर वाजवण्याचा पर्याय शोधला आहे.

IPL म्हटलं की त्याच्यात ग्लॅमर आलाच, कोरोनामुळे यंदा हा ग्लॅमर कमी वाटत असला तरी BCCIनं एक ग्लॅमरस चेहरा IPLमध्ये सहभागी करून घेतला आहे. नेरोली मीडोव्स असे त्या सुंदरीचं नाव आहे.

Fox Sports गेल्या दशकभरात वाहिनीसोबत कार्यरत असलेली महिला क्रीडा पत्रकार आणि TV Presenter नेरोली यंदा IPLमध्ये काम करताना पहायला मिळणार आहे.

वर्लेड कपपासून अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये ओळखीचा चेहरा झालेल्या नेरोलीला काही दिवसांपूर्वीच Cost Cutting चं कारण देत आपली नोकरी गमवावी लागली.

यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण, आता तिला IPL 2020 पर्वात काम करण्याची संधी मिळाली आहे.

IPLमध्ये आपण इशा गुहा, लिसा स्थळेकर, कॅरल एडवर्ड यासारख्या महिला क्रिकेटपटूंना काम करताना पाहिलं आहे.