Budgetच्या आठवड्यात 'या' शेअर्सनी दिले ५६% रिटर्न, अर्थसंकल्पानंतर लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:00 AM2024-02-03T11:00:57+5:302024-02-03T11:02:49+5:30

अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात बराच चढ-उतार दिसून आला होता.

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात बराच चढ-उतार दिसून आला होता. या ट्रेडिंग आठवड्यात, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० २ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत.

BEML Land Assets - अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, BEML लँड असेट्सचे शेअर्स जवळपास २० टक्क्यांनी वाढले आणि ३१२.४५ रुपयांच्या अपर सर्किटवर बंद झाले. जर आपण या संपूर्ण ट्रेडिंग आठवड्याबद्दल बोललो तर यामध्ये 56 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही कंपनी १५ जुलै २०२१ रोजी भारत सरकारनं बीईएमएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणूक योजनेंतर्गत सरप्लस/नॉन कोअर असेट्सच्या डीमर्जरच्या उद्देशानं सुरू केली होती.

AF Enterprises - उद्योगांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एएफ एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास १० टक्क्यांनी वाढले आणि बजेटच्या दुसऱ्या दिवशी बीएसईवर ९.८७ रुपयांवर बंद झाले. जर आपण या अर्थसंकल्पाच्या संपूर्ण व्यावसायिक आठवड्याबद्दल बोललो तर ते ५४ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहे.

Urja Global - सोलार एनर्जी क्षेत्रातील दिग्गज उर्जा ग्लोबलचे शेअर्स या ट्रेडिंग आठवड्यात ५३ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो ३९.८५ रुपयांवर बंद झाला.

Azad Engineering - एरोस्पेस कम्पोनंट्स आणि टर्बाइन बनवणाऱ्या आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स या आठवड्यात सुमारे ३९ टक्क्यांनी वाढले. सध्या त्याची बीएसई वर किंमत ९४५.५० रुपये आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी ३१ जानेवारी २०२४ रोजी तो १,०१३ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षी २८ डिसेंबर २०२३ रोजी लिस्ट झाले होते आणि कंपनीचे शेअर्स ५२४ रुपयांना जारी करण्यात आले होते.

Ad-Manum Finance - नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) Ad-Manam Finance चे शेअर्स बजेटच्या दुसऱ्या दिवशी बीएसई वर १.११ टक्क्यांनी घसरण होऊन ८८.९९ रुपयांवर बंद झाले. दरम्यान, या ट्रेडिंग आठवड्यात ते सुमारे ३४ टक्क्यांनी मजबूत झाले आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कमगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)