Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ताब्यात घेण्यात आलेली मुनमुन धमेचा नेमकी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:50 PM2021-10-04T18:50:33+5:302021-10-04T19:01:22+5:30

Mumbai Cruise Drugs Case : एनसीबीने मुनमुनवर ड्रग्सचं सेवन करणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे असे आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी मुंबईतील (mumbai) एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला.

एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानसह अन्य ८ जणांना ताब्यात घेतलं.

आर्यनसह एनसीबीने अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आर्यनसह अरबाज आणि मुनमुनची चर्चा रंगली आहे.

अरबाजची ओळख समोर आल्यानंतर मुनमुन कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

मुनमुन दिल्लीत राहणारी असून ती मुळची मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे.

गेल्या वर्षी मुनमुनच्या आईचं निधन झालं. मुनमुनला प्रिंस नावाचा एक भाऊ असून तो दिल्लीत नोकरी करतो.

मुनमुनने तिचं शालेय शिक्षण सागरमध्येच केलं होतं. त्यानंतर ती भोपाळला शिफ्ट झाली

मुनमुन एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

मुनमुन तिच्या कूल अंदाजासाठी ओळखली जाते. तसंच पार्टी करणं हा तिचा छंद असल्याचं म्हटलं जातं.

गेल्या ६ वर्षांपासून मुनमुन दिल्लीत आपल्या भावाकडे राहत आहे.

एनसीबीने मुनमुनवर ड्रग्सचं सेवन करणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे असे आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे.