मड स्पासाठी उर्वशी रौतेलाला मोजावी लागली मोठी किंमत,आकडा वाचून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल

Published: June 15, 2021 02:57 PM2021-06-15T14:57:07+5:302021-06-15T15:03:05+5:30

आतापर्यंत योगा वर्कऊट करत स्वतःला फिट ठेवताना अभिनेत्री दिसल्या आता यात आणखी एका गोष्टीचा समावेस झाला आहे मड स्पा. मड स्पा करत अभिनेत्रीने चक्क गच्चीवर सनबाथ घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

रिल लाइफमध्ये सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्याची तयारी प्रत्येक सेलिब्रेटीची असते.

रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप उर्वशी रौतेला करत असते.

आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. नेहमीच उर्वशी तिच्या महागड्या फॅशनमुळे चर्चेत असते.

कधी कधी दिवसातून होणा-या तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विविध पद्धतीच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये अवतरते.

उर्वशीने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे.

त्यामुळे ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स तिच्याकडे पाहायला मिळतात.

रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी उर्वशी रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते.

अधिकाधिक लक्षवेधी ठरावी यासाठी कितीही पैसा लागला तरी उर्वशीची खर्च करण्याची तयारी असते.

मड स्पासाठी देखील उर्वशीला मोठी किंमत मोजावी लागली आहे.

काही मिनिटांसाठीच्या या मड स्पासाठी २० हजार रुपये मोजले आहेत.

रसिकांनी प्रेमाने दिलेले बॉलीवुडची फॅशनिस्टा हे सार्थ ठरवण्याचा बहुदा उर्वशीचा हा प्रयत्न असावा नाही का ?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!