PHOTOS : ही आहे पहिली मराठी सुपरमॉडेल, हिला पाहताच मलायका अरोराचा चढतो पारा

Published: June 11, 2021 02:45 PM2021-06-11T14:45:12+5:302021-06-11T14:58:47+5:30

आपल्या ग्लॅमरस अदांनी घायाळ करणारी उज्वला राऊत ही भारतातील पहिली सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाते.

उज्वला राऊत (Ujjwala Raut) हे मॉडेलिंगच्या दुनियेतील मोठे नाव. होय, उज्वला ही भारतातील पहिली मराठी सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाते.

आज उज्वला तिचा 43 वा वाढदिवस साजरा करतेय. 11 जून 1978 रोजी मुंबईत जन्मलेली उज्वला तिच्या बोल्ड व सुंदर अंदाजासाठी ओळखली जोते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणा-या उज्वलाला न्यूयॉर्क आणि फ्रान्समध्ये होणा-या फॅशन विकच्या रॅम्पवर कॅटवॉक करण्याचा सन्मान मिळाला होता.

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिचे वडील पोलीस अधिकारी होते. लहानपणापासूनच तिला मॉडलिंगची प्रचंड आवड होती.

कॉलेजमध्ये गेल्यावर तिने सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी मिस फेमिना ही सौंदर्य स्पर्धा जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. शिवाय फ्रान्समधील एलिट मॉडेल लूक या स्पर्धेतही ती अंतिम तीन फेरित पोहोचली होती

अभिनेता मिलिंद सोमणसोबत करिअरमधील पहिली जाहिरात करून उज्वला प्रकाशझोतात आली होती. ही जाहिरात किंगफिशची होती.

पुढे मलायका अरोरासोबतच्या कॅट फाईटमुळेही ती अशीच अचानक चर्चेत आली होती. या कॅट फाईटचे कारण होते अरबाज खान.

उज्वला व मलायका ‘सुपर मॉडल आॅफ द इअर’ या शोमध्ये एकत्र दिसल्या होत्या. या शोमध्ये मलायकाशिवाय मिलिंद सोमण व मसाबा गुप्ता जज होते. तर उज्वला मेंटॉर होती.

यादरम्यान अरबाज खान व उज्वलाच्या सोशल मीडियावरच्या सुरू असलेल्या फ्लर्टिंगमुळे मलायका संतापली होती. उज्वला सेटवरच्या क्रू मेंबर्सला अरबाजसोबतचे किस्से रंगवून सांगायची. यामुळे मलायकाचा पारा आणखीच चढला होता.

एकदा उज्वला अरबाज खानसोबत एका रॅम्पवर झळकली होती. त्यावेळी मलायका अरोरा अरबाजची पत्नी होती. तरी देखील त्याने उज्वलासोबत शो स्टॉपर म्हणून वॉक केले होते. हा राग मलायकाच्या मनात आधीच होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!