'ही' आहे सुशांतच्या ५ सिनेमांची कमाई, करण जोहरच्या सिनेमासाठी मिळाले होते सर्वात कमी पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 09:46 AM2020-09-23T09:46:46+5:302020-09-23T10:01:57+5:30

डॉक्टरांनुसार, सुशांत बायपोलर डिसऑर्डर नावाच्य मानसिक आजाराशी लढत होता. तर सुशांतच्या परिवाराचं आणि त्याच्या फॅन्सचं मत आहे की, त्याची हत्या करण्यात आली आहे. आणि त्याला मानसिक आजार असल्याचे सांगत त्याच्या विरोधात षडयंत्र केलं जात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याच्या मृत्युच्या कारणाचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे. पण अजूनही सुशांतच्या मृत्युचं कारण समोर येऊ शकलं नाही. रोज नवीन खुलासे होत असल्याने तपास लांबत चालला आहे.

सुशांत सिंह राजपतू केसच्या तपासादरम्यान त्याच्या पर्सनॅलिटीशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातीलच एक बाब म्हणजे सुशांतला ड्रग्स घेण्याची सवय होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सुशांत डिप्रेशनच्या समस्येशी लढत होता. डॉक्टरांनुसार, सुशांत बायपोलर डिसऑर्डर नावाच्य मानसिक आजाराशी लढत होता. तर सुशांतच्या परिवाराचं आणि त्याच्या फॅन्सचं मत आहे की, त्याची हत्या करण्यात आली आहे. आणि त्याला मानसिक आजार असल्याचे सांगत त्याच्या विरोधात षडयंत्र केलं जात आहे.

सुशांत आयुष्यात भलेही अनेक चढउतार होते पण तो त्याच्या सिनेमात किंवा अभिनयातून ते कधीही दिसू देत नव्हता. कदाचित हेच कारण आहे की, त्याच्या फॅन्सना त्याची नॅच्युरल अॅक्टिंग अधिक आवडत होती. सुशांत आर्थिक कोणतीच अडचण नव्हती. एनसीबीने जया साहा केलेल्या चौकशीतून काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. तिनेच सुशांत काही प्रोजेक्ट्स मिळवून दिले होते.

aajtak.in ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंह राजपूतला मल्टीस्टारर 'छिछोरे' सिनेमासाठी ५ कोटी रूपये मानधन मिळालं होतं. यात सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर, ताहिर भसीन, वरूण शर्मा आणि प्रतिक बब्बरसारखे कलाकार होते. दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारीने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

त्यानंतर मनोज वाजपेयी, रणवीर शौरी आणि आशुतोष राणासारखे स्टार्स असलेल्या 'सोनचिडीया'साठी सुशांतने ५ कोटी रूपये मानधन घेतलं होतं. अभिषेक चौबेच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार चांगलं प्रदर्शन केलं नव्हतं. पण समीक्षकांनी या सिनेमाचं भरपूर कौतुक केलं होतं.

अभिषेक कपूरने दिग्दर्शित केलेल्या 'केदारनाथ' साठी सुशांतने ६ कोटी रूपये मानधन घेतलं होतं. अभिषेक कपूरसोबत २०१३ मध्ये सुशांतने 'काय पो चे' सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. तेच केदारनाथ सिनेमातून सारा अली खानने तिच्या करिअरला सुरूवात केली होती.

त्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. याला सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार रिस्पॉन्स दिला होता. या सिनेमासाठी सुशांतने साडे तीन कोटी रूपये घेतले होते.

तर करण जोहरच्या प्रॉडक्शन बॅनरखाली तयार झालेल्या 'ड्राइव्ह' सिनेमात सुशांत जॅकलिन फर्नांडिससोबत दिसला होता. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. या सिनेमासाठी सुशांतला अडीच कोटी रूपये मिळाले होते.