सोनू सूदने शेअर केले आईचे तरुणपणातील जुने फोटो; लिहिली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:00 PM2021-10-13T16:00:00+5:302021-10-13T16:00:00+5:30

Sonu sood: सोनू सूदने फेसबुक पोस्ट सोबतच इन्स्टाग्रामवरही आईसाठी अशीच पोस्ट शेअर केली आहे.

लॉकडाउनच्या काळात अनेकांचा तारणहार झालेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे सोनू सूद. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी हिरो ठरला.

सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो चाहत्यांसह गरजवंतांच्या कायम संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

सोनू गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने गरजुंची मदत करत असून याचे अपडेट्सही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. या सोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर करतो.

सोनू सूदचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम असून यापूर्वी त्याने अनेक पोस्टमधून आईप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यातच त्याने आईविषयी आणखी एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनू सूदच्या आईचं निधन होऊन आज १४ वर्ष झाली. त्यामुळेच त्याने आईच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.

आईसाठी होणारी तळमळ, प्रेम, जीवाची होणारी घालमेल सारं काही त्याच्या पोस्टमधून दिसून येत आहे.

मिस यू आई! तुला जाऊन आज १४ वर्ष झाली. १३ ऑक्टोबर ही तारीख मला माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत त्रास देत राहिल. खूप प्रेम आई. आयुष्याचे ते धडे शिकवण्यासाठी खूप आभार ज्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे, अशी पोस्ट सोनू सूदने लिहिली आहे.

दरम्यान, सोनू सूदने फेसबुक पोस्ट सोबतच इन्स्टाग्रामवरही आईसाठी अशीच पोस्ट शेअर केली आहे.

सोनू सूदने शेअर केलेल्या फोटोंपैकी लक्षवेधून घेणारा फोटो

सोनू सूदचं संपूर्ण कुटुंब